काश्मीरच्या पूंछपासून ३५ किमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवादी तळ असल्याचे उघड !
पाक सैन्याचा अधिकारी गाझी शहजाद तळाचा प्रमुख !
पूंछ (जम्मू-काश्मीर) – येथून ३५ किलोमीटरवर नियंत्रणरेषेच्या पलीकडे म्हणजे पाकव्याप्त काश्मीरच्या सुदनोती येथे एक नवीन आतंकवादी तळ कार्यरत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. हा तळ हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेचा असून पाकिस्तानी सैन्याचा अधिकारी गाझी शहजाद तो चालवत आहे.
१. पाक सरकारच्या सर्व दाव्यांनंतरही पाकव्याप्त काश्मीरच्या बाग आणि मुझफ्फराबाद येथील आतंकवादी तळ बंद झालेले नाहीत.
२. मुझफ्फराबाद शहरापासून १० किमी अंतरावर नीलम रस्त्याजवळ गेल्या अनेक वर्षांपासून आतंकवादी तळ कार्यरत आहे.
३. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार यांच्या उघड इशार्यावर चालू असलेले हे आतंकवादी तळ जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी घटना घडवत आले आहेत.
४. ‘दक्षिण आशिया आतंकवाद पोर्टल’नुसार पाकमध्ये ७२ अतिरेकी प्रशिक्षण छावण्या आहेत. त्यात अल्-कायदाच्या ५५ छावण्या आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमधील ९५ टक्के जनता आतंकवादाच्या विरोधात !पाकव्याप्त काश्मीरमधील अनुमाने ४० लाख लोकसंख्येपैकी ९५ टक्के जनता भारतात आतंकवाद पसरवण्याच्या पाकच्या कारस्थानांच्या विरोधात आहेत. ‘भारतासमवेत युद्ध करून आम्हाला काही लाभ होणार नाही’, असे तेथील लोकांचे मत आहे; परंतु पाकचे सरकार आणि सैन्य पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेचा हा आवाज जगासमोर येऊ देत नाही. ‘ग्लोबल वॉच’ या संघटनेच्या मते गेल्या वर्षी येथे १ सहस्र २०० लोकांना अवैधरित्या अटक करण्यात आली होती. |
संपादकीय भूमिका
|