मेरठ (उत्तरप्रदेश) येथील उपाहारगृहात मुसलमान तरुणांकडून केला जातो हिंदु तरुणींचा बुद्धीभेद !
|
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील शास्त्रीनगरमध्ये असणार्या एका उपाहारगृहामध्ये हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांकडून बुद्धीभेद केला जात असून येथे ‘लव्ह जिहाद’साठी एक केंद्र चालवले जात असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येथे धाड घातली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी बजरंग दलाच्या आरोपावरून चौकशी चालू केली आहे. ‘हंगर हेड’ असे या उपाहारगृहाचे नाव आहे.
१. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी या उपाहारगृहात प्रवेश केल्यावर तेथे एका भिंतींवर हिंदु तरुणी आणि मुसलमान तरुण यांची नावे लिहिण्यात आल्याचे आढळून आले. तसेच काही आक्षेपार्ह लिखाणही दिसून आले.
२. याविषयी विश्व हिंदु परिषदेचे महानगर सह धर्म प्रसार प्रमुख श्री. अश्वनी गुप्ता यांनी सांगितले की, येथील भिंतींवर अश्लील मजकूर लिहिण्यात आला होता. तसेच उपाहारगृहात काम करणार्यांकडे अश्लील साहित्यही सापडले. पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांना कह्यात घेतले आहे.
३. या उपाहारगृहाचे मालक अरुण यांनी सांगितले की, आमच्या उपाहारगृहात लावण्यात आलेल्या फलकावर उपाहारगृहाला भेट देणार्यांच्या प्रतिक्रिया लावण्यात आल्या असतात. (स्वतःच्या मालकीच्या उपाहारगृहामध्ये असली कृत्ये चालू असतांना त्याविषयी अशा प्रकारे सारवासारव करणार्या मालकाला हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारणे आवश्यक ! – संपादक)
४. पोलीस निरीक्षक सुबोध सक्सेना यांनी अरुण यांना त्यांच्या उपाहारगृहातील भिंतींवर लिहिण्यात आलेला मजकूर हटवण्यास सांगितले आहे.