पुरंदर गडावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी !
गराडे (जिल्हा पुणे) – पुरंदर गडावर १४ मे या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा शासकीय जयंती सोहळा दिमाखात पार पडला. मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढील वर्षी राज्यशासनाच्या वतीने पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येईल आणि गडाच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.
पुरंदर तालुक्यात शंभुसृष्टीसाठी या अगोदर १६ एकर जागा नियोजित करण्यात आली होती. त्यानंतर ७ एकर आणि ३५ एकर अशा एकूण जवळपास ६० एकर जागेचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी या वेळी दिली.