परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाचा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना पुणे आणि सातारा या जिल्ह्यांतील जिज्ञासू, धर्मप्रेमी अन् वाचक यांना आलेल्या अनुभूती !
१. सौ. सोनाली आंबूलकर (‘साधना सत्संगा’तील जिज्ञासू), सिंहगड रस्ता, पुणे.
अ. ‘सोहळा बघतांना मला आनंद आणि चैतन्य मिळाले.
आ. जन्मोजन्मीचे भाग्य म्हणून गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आपल्याला श्रीविष्णु आणि श्रीराम यांच्या रूपांत दर्शन दिले. याबद्दल माझ्याकडून त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. ‘आयुष्यात आता काहीच नको. केवळ गुरुचरणांजवळ रहावे’, असे मला वाटले.
इ. साधिकेला नृत्य करतांना पाहिल्यावर ‘जणूकाही मीच गुरुमाऊलीच्या समोर नृत्य करत आहे आणि गुरुदेव माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला वाटले.
ई. आरती चालू असतांना ‘मी तिथे उभी आहे’, असे मला वाटले.
उ. ‘गुरुमाऊलीने आपली पात्रता नसतांनाही आपल्याला मायेने जवळ केले आहे’, याची जाणीव होऊन माझ्या डोळ्यांतून सतत भावाश्रू येत होते.
ऊ. ‘गुरुमाऊली, आईस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आपल्याला साधनेमध्ये पुढे पुढे नेणार आहेत’, असे मला जाणवले.’
२. सौ. संपदा लावंड (‘साधना सत्संगा’तील जिज्ञासू), हडपसर, पुणे.
अ. ‘मी या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी झाले आहे’, असे मला वाटत होते.
आ. सोहळा पहातांना माझी सतत भावजागृती होत होती.
इ. डोलोत्सव, श्रीविष्णूची आरती, सिंहासनावरील श्री गुरूंचा राज्याभिषेक सोहळा आणि आरती ‘याची देही, याची डोळा’ पाहून मी कृतकृत्य झाले.
ई. गुरूंच्या चरणांवर वाहिलेली फुले डोळ्यांत आणि अंतःकरणात साठवून ठेवून मी कृतज्ञता व्यक्त केली.’
३. सौ. अक्षदा नारकर (‘साधना सत्संगा’तील जिज्ञासू), कोथरूड, पुणे.
अ. ‘सोहळा पहातांना ‘मी रामनाथी आश्रमात आहे’, असे मला वाटले.
आ. प.पू. गुरुदेवांना श्रीविष्णु आणि श्रीराम यांच्या रूपात पहातांना माझा भाव जागृत होत होता.
इ. प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ व्यासपिठावर असतांना मला पुष्कळ चैतन्य जाणवले.
ई. ‘कार्यक्रम संपूच नये’, असे मला वाटत होते. ‘न भूतो न भविष्यति’(पूर्वी कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही.), असा हा सोहळा होता.’
४. सौ. साधना जगताप (धर्मप्रेमी), कात्रज, पुणे.
अ. ‘सकाळी उठल्यापासून मला श्री गुरूंविषयी कृतज्ञता वाटत होती. तेव्हा ‘प्रतिदिन असे होत नाही’, असे मला जाणवले; पण आज काहीही प्रयत्न न करता सर्व अंतर्मनातून होत होते. ‘आतापर्यंत गुरुदेवांनी आपल्याला कसे सांभाळले ?’, हे आठवून दिवसभर कृतज्ञताभाव दाटून येत होता.
आ. सोहळा पाहिल्यावर माझी श्रद्धा वाढायला साहाय्य झाले.’
५. डॉ. (सौ.) सुवर्णा देगलूरकर (‘सनातन प्रभात’च्या वाचिका), गावठाण, पुणे.
अ. ‘कार्यक्रमाच्या वेळी माझ्या अंगावर रोमांच येऊन माझी भावजागृती झाली.
आ. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. विनायक शानभाग (आताची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच या कलियुगातील श्रीविष्णु आणि श्रीराम आहेत.’’ तेव्हा ‘रामनाथी आश्रम हीच अयोध्या आहे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात मला प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन झाले’, असे वाटून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले.’
६. सौ. पुष्पा सकुंडे (‘साधना सत्संगा’तील जिज्ञासू), सातारा
अ. ‘मी ‘लॅब’मध्ये (प्रयोगशाळेत) काम करते. कोरोनामुळे वातावरण भीतीदायक वाटते; परंतु हा कार्यक्रम पहातांना माझी भावजागृती झाली. मला वाटणारी भीती नाहीशी झाली.
आ. कार्यक्रम पहातांना मला पुष्कळ आनंदी वाटत होते.
इ. झोपतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. ‘ते सतत माझ्या समवेत आहेत’, असे मला भासत होते. ‘परात्पर गुरु डॉक्टर समवेत आहेत’, ही जाणीव मला संजीवनी देऊन गेली.’
७. सौ. वृंदा विकास फरांदे (‘साधना सत्संगा’तील जिज्ञासू), वाई, जिल्हा सातारा.
अ. ‘कार्यक्रम चालू झाल्यावर आमच्या वास्तूमध्ये वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. बाहेर जोरदार विजा कडाडत होत्या आणि पाऊस चालू होता; पण आम्हाला त्याची जाणीवही झाली नाही. कार्यक्रम पहातांना माझी भावजागृती होत होती.
आ. आजपर्यंत साधकांनी सत्संगामध्ये श्री गुरुदेवांच्या आध्यात्मिक कार्याची ओळख आणि माहिती सांगितली होती; परंतु जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहातांना ‘हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी अन् हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णु गुरुदेवांच्या रूपाने अवतरले आहेत’, असे मला जाणवत होते.
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या अनुक्रमे माता लक्ष्मी अन् माता सरस्वती दिसत होत्या.’
८. डॉ. (सौ.) साधना वरांडे (‘सनातन प्रभात’च्या वाचिका आणि जिज्ञासू), सातारा
अ. ‘सोहळा पहाण्याच्या आदल्या दिवसापासून माझे मन उदास होते; कारण माझ्या मैत्रिणीच्या सासर्यांचे निधन झाले होते. कार्यक्रम चालू झाल्यानंतर गुरुमाऊलीला पाहून माझ्या डोळ्यांतून पुष्कळ भावाश्रू येत होते. माझी भीती नाहीशी होऊन मन उत्साही झाले.
आ. या कठीण काळात गुरुमाऊलीला पाहून मला पुष्कळ आधार वाटला.’
९. श्री. सचिन जाधव (धर्मप्रेमी), सातारा.
अ. ‘या सोहळ्याच्या माध्यमातून मला ‘न भूतो न भविष्यति’, असे श्री गुरूंचे दर्शन झाले. श्री गुरूंच्या आगमनाच्या वेळी माझी भावजागृती झाली.
आ. श्री गुरूंच्या विष्णुरूपासमोर साधिका नृत्य सादर करतांना मी त्यात इतका तल्लीन झालो की, ‘मी स्वतः नृत्य करून श्री गुरूंची स्तुती करत आहे’, असे मला वाटत होते.
इ. माझ्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू वहात होते.
ई. डोलोत्सवाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ गुरुमाऊलीला झोपाळ्यावर बसवून झोका देत असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची भावजागृती झाली. ते पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
उ. ‘श्रीविष्णु शेषनागावर बसून आनंदाने सर्व सोहळा पहात आहे’, असे मला वाटले.’
(सर्व सूत्रांचा मास : मे २०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |