युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या वैज्ञानिक उपकरणाद्वारे घेतलेल्या चाचण्यांतून अध्यात्मातील गूढ गोष्टींची उकल करून ती जगासमोर मांडणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात आध्यात्मिक घटनांवर विविधांगी संशोधन केले जाते. ते संशोधन आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही स्तरांवर केले जाते. त्याविषयी मला जाणवलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी येथे दिल्या आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मातील अनेक गूढ गोष्टींची उकल करून ती जगासमोर मांडणे
१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने काही साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळणे : एखादी घटना घडते, तेव्हा सूक्ष्मातून घडणारी प्रक्रिया जाणून घेण्याची सेवा गुरुकृपेने काही साधक करतात. ही सेवा ज्ञानप्राप्तीच्या माध्यमातून आरंभी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केली. पुढे ती सेवा करण्यासाठी कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि श्री. राम होनप, असे साधक सिद्ध झाले. या साधकांनी सूक्ष्मातील मिळणार्या ज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टींचे सूक्ष्म परीक्षण केले.
१ आ. ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाचा वापर करून उत्तम संशोधन करणारे साधक सिद्ध करणे : ‘यू.ए.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे एखादी वस्तू किंवा घटक यांची प्रभावळ किंवा ऊर्जावलय मोजता येते. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) याचा आध्यात्मिक घटनांचे संशोधन करण्यासाठी लाभ करून घेतला. असे संशोधन करण्यासाठी आधी श्री. रूपेश रेडकर आणि नंतर श्री. आशिष सावंत हे साधक सिद्ध झाले. ‘या साधकांना या उपकरणाचा दैवी वापर कसा करायचा ?’, हे उमगले’, ही सर्व आपलीच कृपा आहे गुरुदेव !
१ इ. सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान आणि वैज्ञानिक उपकरणाद्वारे मिळालेल्या नोंदी यांचा सुयोग्य मेळ घालून आध्यात्मिक गोष्टींतील कार्यकारणभाव जगापुढे मांडणे : गुरुदेवांनी अनेक आध्यात्मिक घटना आणि घटक यांच्या ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचण्या करून घेऊन त्या घटकांचे ऊर्जावलय जाणून घेतले अन् त्या चाचणीतील निरीक्षणांची आध्यात्मिक सूक्ष्म परीक्षणांच्या विश्लेषणांशी सांगड घातली. गुरुदेवांनी त्यांचा सुयोग्य मेळ घालून आध्यात्मिक गोष्टींतील कार्यकारणभाव जगापुढे मांडला.
२. ‘यू.ए.एस्.’ हे वैज्ञानिक उपकरण वापरणार्या साधकांवर असलेली गुरुकृपा !
२ अ. ‘यू.ए.एस्.’ हे उपकरण वापरून चाचण्या करतांना अडचणी आल्यावरही मनाची एकाग्रता ढळू न देता चाचण्यांच्या निरीक्षणांच्या नोंदी पूर्ण करणे : ‘अनेक वेळा अनेक घंटे उन्हात उभे राहून चाचण्या करून त्यांच्या नोंदी पूर्ण करणे, तसेच काही वेळा चाचण्या करतांना त्यांत अनेक अडथळे येऊनही मनाची एकाग्रता ढळू न देता निरीक्षणांच्या नोंदी पूर्ण करणे’, हे एक मोठे आव्हान असते; पण गुरुकृपेने आधी श्री. रूपेश रेडकर आणि आता श्री. आशिष सावंत ते आव्हान सहजतेने पेलत आहेत.
२ आ. ‘यू.ए.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचण्या करता करता चाचण्या करण्यापूर्वीच त्यातील स्पंदने समजण्याची क्षमता साधकांमध्ये निर्माण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! : अशा चाचण्या करून त्यात नोंदवलेल्या निरीक्षणांचा अभ्यास करता करता आता हे उपकरण वापरण्याआधीच या दोघांमध्ये त्या घटकातील स्पंदने कळण्याची क्षमता निर्माण झाली आहे. मला वाटते, ‘हा केवळ गुरुदेवांचा त्यांच्यावर असलेला वरदहस्तच आहे.’
३. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी स्पंदनशास्त्राचा उत्तम अभ्यास करून अनेक घटनांचे स्पंदनशास्त्राच्या आधारे विश्लेषण केले.
अशा प्रकारे गुरुदेवांनी अध्यात्मातील गूढ गोष्टींची उकल करून ती जगासमोर मांडली.
४. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘यू.ए.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे जेवढ्या चाचण्या किंवा जेवढे प्रयोग केले आहेत, तेवढे संपूर्ण जगात कुणीही केले नसावेत’, असे मला वाटते.
५. कृतज्ञता
जे सनातनमध्ये आहे, ते अन्यत्र कुठेच नाही. गुरुदेवांनी प्रत्येक साधकाचे कर्तृत्व आणि साधना याला एक दिव्य आकार दिला आहे. गुरुदेव, या दिव्य रत्नांच्या निर्माणासाठी आपल्या चरणी अखंड कृतज्ञता !’
– श्री. अक्षय नागेश पांडे, १९/अ, तिरुपती कॉलनी, वडगांव, यवतमाळ. (२.५.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |