गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील डासना मंदिरात घुसलेला मुसलमान तरुण पोलिसांच्या कह्यात !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील डासना मंदिरात २ अल्पवयीन मुलींसह संशयास्पदरित्या घुसलेला मोहसीन याला पकडण्यात आले आहे. या मुलींपैकी एक हिंदु आणि दुसरी मुसलमान आहे. त्यांनी आधारकार्ड दाखवून मंदिरात प्रवेश केला होता. मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांचा आरोप आहे की, मोहसीन मंदिरात घुसून येथील माहिती गोळा करू इच्छित होता. मंदिराकडून या संदर्भात पोलिसांकडे कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. पोलिसांनी मात्र या तिघांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी चालू केली आहे.
Mohsin and a minor Muslim girl enter Dasna temple using ID of a minor Hindu girl, all 3 detained, Yati Narsinghanand accuses him of doing reccehttps://t.co/d1G3i6GNio
— OpIndia.com (@OpIndia_com) May 17, 2023
१. महंत यति नरसिंहानंद यांनी सांगितले की, मोहसीन याचे वय २५ वर्षे आहे. तो प्रतिदिन कुटुंबासमवेत येणार्या अल्पवयीन हिंदु मुलीच्या आधारकार्डच्या आधारे मंदिरात घुसला होता; मात्र माझ्या खासगी सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले. त्याच्या केलेल्या तपासणीमध्ये त्याच्याकडे कोणतेही शस्त्र सापडले नाही.
२. यापूर्वी वर्ष २०२१ मध्ये काशिफ आणि विपुल नावाचे दोन तरुण मंदिरात घुसले होते. त्यांच्याकडे ‘सायनाईड’ (एक प्रकारचे विष) आणि ‘सर्जिकल ब्लेड’ (शस्त्रकर्मासाठी वापरण्यात येणारे ब्लेड) सापडले होते. या घटनेच्या काही मासानंतर मंदिरात पहाटे काही जणांनी घुसून २ साधूंवर चाकूने वार केले होते.