भारत सोडून पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेणे, ही माझ्या आजी-आजोबांची घोडचूक ! – शयान अली, सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध असणारे पाकिस्तानी नागरिक
न्यूयॉर्क – पाकिस्तानातील सामाजिक माध्यमांवर सक्रीय असलेले शयान अली यांना पाकिस्तान सोडावा लागला. ‘मी पाकच्या आय.एस्.आय.च्या इशार्यांवर नाचू शकत नाही. माझी हत्या होईल, अशी मला भीती होती. त्यामुळे मी पाकिस्तान सोडले. फाळणीच्या वेळी माझ्या आजी-आजोबांनी भारत सोडून पाकिस्तानमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय ही घोडचूक होती’, असे ट्वीट शयान अली यांनी केले आहे. सध्या ते अमेरिकेत वास्तव्य करत आहेत.
१. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पाकची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली होती. त्याची जगाला काहीच आवश्यकता नव्हती. पाकिस्तान नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही. या ट्वीटमध्ये त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज हातात धरला आहे, असे दिसत आहेत.
There is no such thing as “Pakistan” 🇵🇰
Pakistan was created in the name of religion not because it was needed.
My grandparents chose Pakistan instead of India 🇮🇳 only because they were Muslims, and migrating to Pakistan was the biggest mistake of my grandparents.
If I was in… pic.twitter.com/RAfYDb5ZYU
— Shayan Ali (@ShayaanAlii) May 17, 2023
२. ‘मुसलमान आणि हिंदू कधी शत्रू नव्हते. काही समाजविघातक घटकांना या दोन्ही समूहांना वेगळे करायचे होते. (असे किती मुसलमानांना वाटते ? बहुतांश धर्मांध वृत्तीचे मुसलमान हे हिंदूंचा द्वेष करतात आणि त्यामुळे हिंदुद्वेषी कारवाया करतात, हेच सत्य आहे ! – संपादक) काही बाहेरील शक्ती ‘अखंड भारता’ला घाबरले होते’, असेही त्यांनी म्हटले आहे.
३. शयान अली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसक आहेत. त्यांना हनुमान चालिसा कंठस्थ आहे. त्यांनी याआधीही पाकिस्तानचे अस्तित्व नाकारले आहे.
४. ‘वर्ष १९४७ नंतर पाकिस्तानची संस्कृती, म्हणजे भारतीय संस्कृतीची केलेली नक्कल होती. ज्यांनी फाळणी करून स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती केली, त्यांच्यात स्वतःची वेगळी संस्कृती निर्माण करण्याची क्षमता नव्हती’, असेही त्यांनी पूर्वी म्हटले आहे.
५. याआधीही पाकिस्तानातील पत्रकार आरजू काझमी यांनी ‘फाळणीच्या वेळी भारत सोडून पाकिस्तानात जाण्याचा आजी-आजोबांनी निर्णय घेऊन आमच्या भविष्याची वाट लावली’, अशा आशयाचे ट्वीट केले होते.
संपादकीय भूमिकाभारतातील पाकप्रेमींना याविषयी काय म्हणायचे आहे ? |