नवजात अर्भकांची लाखो रुपयांना खरेदी-विक्री !
|
उल्हासनगर – येथील महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये नवजात अर्भकांची लाखो रुपयांना खरेदी-विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. डॉ. चित्रा चैनानी यांनी नवजात अर्भकांच्या विक्रीची एक टोळीच बनवली होती.
या प्रकरणी आरोपी डॉ. चित्रा चेनानी यांच्यासह ५ महिला दलालांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार एका समाजसेवकाच्या लक्षात आला. त्यांनी काही लोकांना ‘बनावट’ ग्राहक बनवून त्यांना नर्सिंग होममध्ये पाठवले. तेव्हा सत्य समोर आले.
(सौजन्य : abp माझा)
नाशिकहून आलेल्या २२ दिवसांच्या बाळाला ‘बनावट’ ग्राहकाला विकण्याचे डॉक्टरांनी ठरवले होते. त्या बाळाची किंमत ७ लाख अशी ठरवण्यात आली होती. या बाळाला विकतांना पोलिसांनी रंगेहात पकडले. मुली आणि मुले यांचे दर वेगवेगळे असल्याचे समजते.
संपादकीय भूमिकापैशांच्या लोभापायी कोवळ्या जिवांच्या संदर्भात असा प्रकार करणार्या निष्ठूरांना आजन्म कारावासाची शिक्षा द्यायला हवी ! |