खाजगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारणीविषयी तक्रार करण्याचे  प्रशासनाचे आवाहन

प्रतिकात्मक चित्र

रत्नागिरी – परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून राज्यातील खासगी कंत्राटी प्रवाशी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीविषयी पुढीलप्रमाणे निर्देश प्राप्त झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्य:स्थितीचे भाडेदर विचारात घेवून खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणार्‍या प्रती कि.मी. भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक रहाणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ या दिवशी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना परिवहन आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात आगामी चालू होणार्‍या गर्दीच्या हंगामाच्या अनुषंगाने या कार्यालयाच्या कार्यकारी अधिकारी यांना पुढीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत. गर्दीच्या हंगामात खासगी बसमालकांकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति कि.मी. भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारत नसल्याची वेळोवेळी सातत्याने खातरजमा करण्यात यावी. उक्त विषयांकित प्रकरणी वेळोवेळी दिलेल्या आदेशाची कार्यवाही करण्यात यावी.

खासगी वाहतुकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास सदर वाहतुकदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच प्रवाशांना आवाहन करण्यात येते की, असे जादाचे भाडे आकारणार्‍या बसमालकांविरुद्ध पुराव्यानिशी लेखी स्वरूपात छायाचित्रासह या कार्यालयाच्या ई-मेल पत्ता dyrto. 08-mh@gov.in अथवा (०२३५२)२२९४४४ या कार्यालयाच्या क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.