अर्जुन राम मेघवाल हे नवे कायदामंत्री !
|
नवी देहली – केंद्रशासनाने कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या खात्यात पालट केला असून त्यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे. अर्जुन राम मेघवाल हे आता नवे कायदामंत्री असतील. मेघवाल यांना स्वतंत्र पदभार देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मेघवाल यांच्याकडे संसदीय कामकाज राज्यमंत्रीपदाचेही दायित्व आहे.
आज केंद्रीय विधि एवं न्याय मंत्रालय का कार्यभार संभालने से पहले साथी केंद्रीय मंत्री श्री @KirenRijiju जी से आत्मीय भेंट करके मार्गदर्शन लिया।@MLJ_GoI pic.twitter.com/Wb2obbhOE7
— Arjun Ram Meghwal (@arjunrammeghwal) May 18, 2023
रिजिजू यांनी काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत होते. रिजिजू म्हणाले होते की, काही निवृत्त न्यायाधीश भारतविरोधी गटाचा भाग बनले आहेत.