मुसलमान युवतीशी विवाह करणार्या हिंदु तरुणाची युवतीच्या कुटुंबियांकडून हत्या
खांडवा (मध्यप्रदेश) – येथे मुसलमान युवतीशी प्रेम करून तिच्याशी विवाह करणार्या हिंदु तरुणाची युवतीच्या कुटुंबियांनी अमानुष मारहाण करून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे.
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील जितेंद्र उपाख्य राजू सैनी ३ वर्षांपूर्वी खांडवा, मध्यप्रदेश येथे कामासाठी आला होता. येथे एका उपाहारगृहात तो कामाला होता. त्याची ओळख अमरीन हिच्याशी झाली. त्यांच्यात प्रेम निर्माण झाल्यावर कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दोघांनी विवाह केला. विवाहानंतर ते सीकर येथे राजू याच्या गावी गेले. अमरीन हिच्या कुटुंबियांनी ती हरवल्याची पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. पोलिसांना तिचा शोध चालू केला असता त्यांना ती सीकरमध्ये आढळली. तोपर्यंत अमरीन एका मुलीची आई झाली होती. पोलिसांनी अमरीनला कह्यात घेऊन न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयात अमरीनने स्वत:ला प्रौढ असल्याचे सांगून राजू सैनीसमवेत रहाण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयाने दोघांना एकत्र रहाण्याची अनुमती दिली.
Khandwa, MP: Raju Saini falls in love and marries a Muslim woman, has a baby girl, and then is beaten and killed brutally by the girl’s familyhttps://t.co/32DOI5Vsxp
— OpIndia.com (@OpIndia_com) May 17, 2023
काही दिवसांनी अमरीनने आपल्या आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राजू सैनी याने तिला तिच्या माहेरी आणून सोडले. काही दिवस उलटल्यानंतर राजू त्याची पत्नी आणि मुलगी यांना घेण्यासाठी सासरी गेला: मात्र त्याला तेथून पिटाळून लावण्यात आले. राजू याने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. १३ मे २०२३ या दिवशी राजू सासरच्या घरी गेला. त्याने पत्नी आणि मुलीला समवेत पाठवण्याची मागणी केली. या वेळी राजू याला त्याची सासू, सासरे आणि मेव्हणे यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे राजूची प्रकृती बिघडली. त्याला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचार चालू असतांना १६ मे या दिवशी त्याचा मृत्यू झाला. खांडवाचे पोलीस अधीक्षक सत्येंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची सासू, सासरे आणि मेव्हणे यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|