गोवा : मंत्रीपद देण्यासाठी भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे पैशांची मागणी करणारा पोलिसांच्या कह्यात !
पणजी, १७ मे (वार्ता.) – पेडणे येथील भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळामध्ये मंत्रीपद देण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून पैशांची मागणी करणारा मोरबी, कर्णावती, गुजरातस्थित नीरज सिंह राठोड याला नागपूर पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
(सौजन्य : ABP MAJHA)
नीरज सिंह राठोड हा स्वत: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सचिव असल्याचा दावा करत आहे. पोलिसांच्या मते संशयित नीरज सिंह राठोड याने आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह महाराष्ट्रातील ४ आमदार आणि नागालँड येथील एक आमदार यांनाही विविध बहाणा करून संपर्क केला आहे. नागपूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नीरज सिंह राठोड याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून त्याला कह्यात घेतले आहे.