‘लव्ह जिहाद’विषयी हिंदु जागृत होण्याच्या भीतीने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध ! – अधिवक्त्या मणी मित्तल, सर्वोच्च न्यायालय
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘द केरल स्टोरी : बंदी चित्रपटावर कि अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर ?’
मुंबई – ‘लव्ह जिहाद’ या संवेदनशील विषयावर ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट बनवणारे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे अभिनंदन केले पाहिजे. बंगाल आणि तमिळनाडू सरकारने ‘द केरल स्टोरी’वर बंदी घातली. साम्यवादी आणि मुसलमान यांचे तुष्टीकरण करणार्या या राज्य सरकारांना न्यायालयाने याविषयी फटकारल्यावरही हिंदूंच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला यांनी ठेच पोचवली. या राज्यात चित्रपटावर जरी बंदी घातली असली, तरी आता भारतातच नव्हे, विदेशातही अनेक देशांत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. या चित्रपटामुळे ‘लव्ह जिहाद’ घडवून आणणार्या लोकांचे पितळ उघडे पडले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून धर्मांध आणि जिहादी यांचे खरे स्वरूप लोकांसमोर येत आहे. तसेच ‘इसिस’चा विकृत चेहरा लोकांसमोर येत आहे. ‘द केरल स्टोरी’सारखे चित्रपट पाहून हिंदू जागृत होतील, या भीतीमुळे चित्रपटाला विरोध होत आहे, असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या मणी मित्तल यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने ‘द केरल स्टोरी : बंदी चित्रपटावर कि अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित केला होता. त्यामध्ये त्या बोलत होत्या.
‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यायला हवा ! – अधिवक्त्या मणी मित्तलअधिवक्त्या मणि मित्तलखरे तर ‘द केरल स्टोरी’मध्ये ‘लव्ह जिहाद’विषयी थोडेसे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात वस्तूस्थिती पुष्कळ भयानक आहे. हिंदूंच्या विरोधात ‘ओ माय गॉड’, ‘पीके’ असे अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले, तसेच ‘आश्रम’सारख्या वेब सिरीजमधून हिंदु धर्म आणि ऋषिमुनी यांचा अवमान करण्यात आला. ‘द केरल स्टोरी’ला विरोध करणारे त्या वेळी गप्प होते. ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला पाहिजे. |
अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त अल्पसंख्यांकांसाठी आहे का ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट फक्त केरळपुरता मर्यादित नसून देश-विदेशात ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र चालू आहे, त्याविषयी वास्तव दाखवणारा आरसा आहे. या चित्रपटातून ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेचे वास्तव समोर आले आहे. या चित्रपटाला काही पक्षांचे राजकीय नेते विरोध करत असतील, तर अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त अल्पसंख्यांकांसाठी आहे का ? ‘लव्ह जिहाद’ आणि ‘आतंकवाद’ यांचे वास्तव न स्वीकारून ‘हा चित्रपट मुसलमानांच्या विरोधात आहे’, असा भ्रामक प्रचार केला जात आहे. चित्रपट बनवणार्यांनी जे धाडस दाखवले आहे, त्या सर्वांचे हिंदु जनजागृती समिती अभिनंदन करते. हिंदु समाज आता जागृत असून ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी अनेक लोक सामाजिक माध्यमांसह विविध माध्यमांतून प्रसार करत आहेत, तेही अभिनंदनास पात्र आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरल स्टोरी’ यांसारखे हिंदूंना जागृत करणारे अनेक चित्रपट बनवणे आवश्यक आहे.