युगांडात कर्जावरून पोलिसाने बँकेच्या भारतीय अधिकार्याची केली हत्या !
कम्पाला (युगांडा) – येथील एका बँकेत कार्य करणार्या उत्तम भंडारी नावाच्या एका भारतीय अधिकार्याची एके-४७ बंदुकीद्वारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मारेकरी हा पोलीस हवालदार असून कर्जाची रक्कम वाढवल्याचा निष्कर्ष काढून त्याने भंडारी यांच्यावर गोळीबार केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रित झाली आहे. इव्हान वाबवायर असे या ३० वर्षीय मारेकर्याचे नाव असून त्याच्यावर २१ लाख शिलिंग (४६ सहस्र रुपये) इतके कर्ज होते. पोलिसांनी घटनास्थळावरून १३ गोळ्या जप्त केल्या आहेत.