कोल्हापुरात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने वटेश्वर मंदिरात महादेवाला अभिषेक !
कोल्हापूर, १७ मे (वार्ता.) – नाशिक येथील स्थानिक ऊरुसाच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत काही मुसलमानांनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध करण्यासाठी, तसेच या प्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी बसस्थानकाशेजारी असलेल्या वटेश्वर मंदिरात शंकराच्या पिंडीला अभिषेक घातला. नंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी स्वीकारले.
या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, युवासेना तालुकाअधिकारी श्री. संतोष चौगुले, उपशहरप्रमुख श्री. शशी बीडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि श्री. शिवानंद स्वामी, हिंदू एकताचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप उपस्थित होते.