पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या भित्तीपत्रकांवर काळी शाई फासून लिहिले ‘चोर ४२०’ !
पाटलीपुत्र (बिहार) – येथे गेल्या ५ दिवसांपासून बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची हनुमंत कथा चालू आहे. त्या संदर्भात ठिकठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. यांतील काही भित्तीपत्रकांवर काळी शाई फासून ‘चोर ४२०’ असे लिहिण्यात आल्याचे समोर आले आहे. यापूर्वी काही ठिकाणी त्यांची भित्तीपत्रके फाडण्यात आली होती. या घटनांमुळे त्यांच्या भक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Video: Dhirendra Shastri के पोस्टर पर असामाजिक तत्वों ने पोती कालिख, लिखा 420 और चोर #dhirendrashastri #patna #bihar #धीरेंद्रशास्त्री #पटना #बिहार https://t.co/SXPCmqyuba
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) May 17, 2023
संपादकीय भूमिकाबिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! |