६ राज्यांतील १२२ ठिकाणी एन्.आय.ए.कडून धाडी !
नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) १७ मे या दिवशी ६ राज्यांतील १२२ ठिकाणी धाडी टाकल्या. जिहादी आतंकवादी आणि अमली पदार्थ तस्कर यांच्या विरोधातील कारवाईच्या अंतर्गत या धाडी घालण्यात आल्या. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांत या धाडी घालण्यात आल्या.
सौजन्य इंडिया टूडे
गेल्या ३ दिवसांत एन्.आय.ए.ची ही दुसरी मोठी शोधमोहीम आहे. यापूर्वी एन्.आय.ए.ने जम्मू-काश्मीरमध्ये अशा प्रकारच्या धाडी घातल्या होत्या.