भारतातील नाणी भारतात चालत नाहीत. ती चालण्यासाठी दुकानदारांना नोटीस द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘सुराज्य अभियान’च्या वतीने १० रुपयांची नाणी स्वीकारण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (‘आर्.बी.आय.’च्या) आदेशाचे पालन करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी गोवा राज्य माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर अन् पणजी येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव गावस देसाई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. हे निवेदन रिझर्व्ह बँकेचे अधिकारी क्लिंट यांनाही देण्यात आले होते. यानंतर संबंधितांकडून काही दुकानांवर १० आणि २० रुपयांची नाणी स्वीकारण्याविषयी नोटीस लावण्यात आली आहे.’ (१४.५.२०२३)