‘शंभुगर्जना युवा प्रतिष्ठान’च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी !
संभाजी महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी !
सांगली – येथील ‘शंभुगर्जना युवा प्रतिष्ठान’च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साही आणि पारंपरिक स्वरूपात साजरी करण्यात आली. १४ मे या दिवशी सकाळी ८ वाजता शिवतीर्थावर (मारुति चौक) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ही ज्योत शहरातील विविध मार्गांवरून नेऊन अहिल्यादेवी होळकर चौक, बालाजी मील रोड येथे नेण्यात आली. येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना आणि पूजन करण्यात आले.
सायंकाळी ७ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात श्रीमती तोफखाने यांनी हिंदु धर्माचे महत्त्व आणि त्यातील कृतींमागील शास्त्र, धर्मपालनाचे महत्त्व सांगितले. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. विश्वजीत सोवनी यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करणार्यांचा मंडळाच्या वतीने रोप देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर शाहीर बजरंग आंबी यांनी पोवाडा सादर केला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मंडळाच्या वतीने आयोजित सर्व कार्यक्रम हे आदर्श आणि इतरांना प्रेरणा देणारे होते.
क्षणचित्रे
१. सर्वच कार्यक्रमांचे आयोजन ध्वनीप्रदूषण न करता शिस्तबद्ध, आणि नियोजनबद्ध असे करण्यात आले होते.
२. व्याख्यानाचा प्रारंभ निरांजनाने दीपप्रज्वलन करून करण्यात आला.