सानपाडा येथे जलवाहिनीत मृत कबूतर आढळले !
नवी मुंबई, १६ मे (वार्ता.) – सानपाडा येथे जलवाहिनीत मृत कबूतर आढळून आले आहे. याची महापालिकेकडून त्वरित नोंद घेऊन संबंधित सोसायटीची पाण्याची टाकी स्वच्छ केली आहे. २ दिवस पाणी अतिशय अल्प येत असल्याने टाकीची पहाणी केली असता वरील प्रकार उघड झाला. या प्रकरणी पाणीपुरवठा विभागाच्या ज्या कर्मचार्यांनी कामात हलगर्जीपणा केला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख विसाजी लोके यांनी केली आहे. ४ दिवसांपूर्वीच सानपाडा विभागाला पाणीपुरवठा करणार्या जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली होती.