सातारा जिल्हा न्यायालयात लाच घेतांना अधिवक्त्याला अटक !
सातारा, १६ मे (वार्ता.) – येथील जिल्हा न्यायालयातील अधिवक्ता विलास बाळकृष्ण कुलकर्णी यांना तक्रारदार यांच्याकडून १ लाख रुपये लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेचा दावा जिल्हा न्यायालयात चालू आहे. दिवाणी न्यायालयात दाव्याचा निकाल संस्थेच्या बाजूने लावण्यासाठी लोकसेवकावर प्रभाव पाडून अधिवक्ता कुलकर्णी यांनी २ लाख रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली. तक्रारदार यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य आणि सत्यता पडताळून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. २ लाख रुपयांपैकी १ लाख रुपये स्वीकारतांना अधिवक्ता कुलकर्णी यांना रंगेहात पकडण्यात आले.
संपादकीय भूमिकाअशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल ! |