(म्हणे) ‘त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा वाद निरर्थक असून हा वाद अपसमजातून झाला !’
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांचा दावा !
त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) – त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी मुसलमानांचा जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या घटनेसंदर्भात तक्रार प्रविष्ट करून कठोर कारवाई करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला, तर दुसरीकडे प्रवेश करण्याचा वाद निरर्थक असून हा वाद अपसमजातून झाला आहे, असा दावा नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी १६ मे या दिवशी केला.
पोलीस अधीक्षक उमप पुढे म्हणाले की, त्र्यंबकेश्वर मंदिरात उत्तर दरवाजातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार करण्यात आली होती. धूप दाखवण्यासाठी आलेल्या तरुणांना सुरक्षारक्षकांनी अडवले; कारण दर्शनाची वेळही संपलेली होती. हे सर्व झाल्यानंतर प्रवेशद्वारावरून ते परत गेले. संबंधित प्रवेश करणार्या लोकांनीही हे मान्य केलेले असून यात कुणाचा जर विरोध असेल, तर आम्ही मंदिराकडे जाणार नाही’, असेही ते म्हणाले होते.’’ (यावरून ‘पोलिसांकडून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होत आहे’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? – संपादक)
गडदुर्गांवरील अतिक्रमणानंतर मुसलमानांकडून धार्मिक स्थळांचाही ताबा घेण्याचा प्रयत्न ! – आमदार नितेश राणे, भाजप
याविषयी भाजपचे नेते आमदार नितेश राणे म्हणाले की, त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगावर बलपूर्वक चादर टाकण्याचा प्रयत्न झाला. मुसलमान हट्ट धरतात. त्यांनी पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडदुर्गांवर अतिक्रमण चालू केले, आता तर धार्मिक स्थळाचा ताबा घेण्याचा प्रयत्न चालू झाला असून उद्या ते घरातही येतील.
संपादकीय भूमिका
|