‘मोचा’ चक्रीवादळामुळे बंगालमध्ये ९ जणांचा मृत्यू
मिझोराममध्ये २३६ घरांची हानी
कोलकाता (बंगाल) – ‘मोचा’ चक्रीवादळामुळे बंगालमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला, तर मिझोराम राज्यात २३६ घरांची हानी झाली. १५ मेच्या रात्री या चक्रीवादळाने बंगाल आणि मिझोराम राज्याला धडक दिली. त्यानंतर हे वादळ म्यानमारच्या दिशेने गेले. कोलकाता येथे जोरदार वार्यामुळे जवळपास २५ झाडे उन्मळून पडली. यामुळे ७ चारचाकी गाड्या आणि एका दुचाकी यांची हानी झाली.