कोंढवा (पुणे) येथे जनावरांची विनापरवाना कत्तल उघडकीस !
पोलिसांना जमावाकडून धक्काबुक्की
पुणे – कोंढवा येथील मीठानगर परिसरात अवैधपणे चालू असलेली जनावरांची कत्तल रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणी १५ ते २० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस नाईक चंद्रकांत मिसाळ यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
कोंढवा परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये पशूसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसतांना जनावरांची कत्तल चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे एक पथक कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. कारवाईला विरोध करण्यासाठी १० ते १५ जण तेथे जमले. त्यानंतर जमाव पोलिसांच्या अंगावर धावून गेला. शिवीगाळ करून पोलिसांना जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी तेथून २० ते २५ किलो मांस आणि साहित्य जप्त केले आहे.
संपादकीय भूमिकागुन्हेगारांना कायद्याचे अथवा पोलिसांचे भय उरलेले नाही, हेच अशा घटना दर्शवतात. स्वतः असुरक्षित असलेले पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? |