निद्रिस्त हिंदु समाजामुळे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात चादर चढवण्याचे धाडस ! – नितेश राणे, आमदार भाजप
कर्नाटकमध्ये काँग्रेस नाही, तर जिहादींची सत्ता आली असल्याचा उल्लेख !
कणकवली – श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात चादर चढवण्याचा प्रयत्न काही धर्मांध मुसलमानांनी केला. हिंदु समाज एकवटलेला नाही आणि तो निद्रिस्त आहे, म्हणूनच हे धाडस धर्मांध मुसलमान करू शकले. हिंदु समाजाने हा धोका वेळीच ओळखला नाही, तर सिद्धिविनायक मंदिर, कोल्हापूरची महालक्ष्मी, पंढरपूरचा विठ्ठल, अशा पवित्र स्थळांवर धर्मांध मुसलमान अतिक्रमण करतील आणि अशा चादरी चढवत जिहादी हिंदूंच्या घरापर्यंत येतील. तेव्हा पुष्कळ उशीर झालेला असेल. हिंदूनो, वेळीच सतर्क आणि जागृत होऊन स्वतःच्या हक्कांसाठी अन् स्वधर्मासाठी पेटून उठा, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.
त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाकडून बळजबरीनं घुसण्याचा प्रयत्न!!! pic.twitter.com/RDcs9ph2Xa
— nitesh rane (@NiteshNRane) May 16, 2023
कणकवली येथे माध्यमांशी बोलतांना आमदार नितेश राणे यांनी हिंदु देवता आणि धर्म यांवर इस्लमी धर्मांध व्यक्तींकडून घाला घालण्याच्या होत असलेल्या प्रयत्नांवर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले…
१. एखाद्या हिंदूने हाजीअली, माहीम दर्गा, अजमेर शरीफ या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा घालण्याचा प्रयत्न केला असता, तर आज महाराष्ट्रासह भारत देश या लोकांनी पेटवला असता.
२. धर्मांधांनी यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर अतिक्रमणे केली, आता धार्मिक स्थळांवर अतिक्रमणे, देवतांवर अतिक्रमणे करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे.
(सौजन्य : MahaMTB)
३. आज कर्नाटक राज्यातील हिंदु रडतो आहे. त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आलेली नाही, तर जिहादींची सत्ता आली आहे. म्हणूनच त्या ठिकाणच्या वक्फ बोर्डच्या प्रमुखाने उपमुख्यमंत्री पद, गृहमंत्री पद, शिक्षणमंत्री पद, अशी महत्त्वाची खाती मुसलमान आमदारांना मिळावी, अशी मागणी केलेली आहे. काँग्रेसने ही खाती देण्याचे वक्फ बोर्डला निवडणुकीत मान्य केलेले आहे.
४. महाराष्ट्रातही अशाच पद्धतीने हिंदु समाजाला अंधारात ठेवून सत्ता मिळवण्याचा कट रझा अकादमी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काही नेत्यांमध्ये शिजलेला आहे. त्याविषयी बैठकही त्यांनी घेतलेली आहे.