(म्हणे) ‘भारतात अद्यापही अल्पसंख्यांकांवर आक्रमणे चालूच ! – अमेरिका
अमेरिकेची पुन्हा भारतविरोधी गरळओक !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी वर्ष २०२२ च्या धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात पुन्हा एकदा भारतातील धार्मिक स्वातंत्र्याविषयी गरळओक केली आहे. या संदर्भात अमरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकार्याने सांगितले की, भारतात धार्मिक अल्पसंख्यांकांवरील अत्याचार अद्यापही चालू आहेत. भारत असा देश आहे की, सातत्याने या संदर्भात चिंतेचा कारण बनलेला आहे. या अहवालामध्ये भारतावर टीका करणारीच माहिती आहे. तेथे ख्रिस्ती, मुसलमान, शीख, तसेच हिंदु दलित यांच्या संदर्भात लक्ष्यित आक्रमणे होत आहेत. याविषयी अमेरिकी सरकार भारत सरकारला चेतावणी देत रहाणार आहे.
अमेरिका ने एक बार फिर धार्मिक हिंसा को लेकर भारत को निशाना बनाने की कोशिश की है. #USA #India #ReligiousFreedomhttps://t.co/xWL6sZ4eKV
— ABP News (@ABPNews) May 16, 2023
संपादकीय भूमिकाअमेरिका गेली काही वर्षे भारतात कथितरित्या होत असलेल्या अल्पसंख्यांवरील आक्रमणांवरून भारताला लक्ष्य करत आहे. याविषयी भारत सरकारने अमेरिकेला खडसावले, तरी अमेरिकेची शेपूट सरळ होण्याचे नाव घेत नाही. आता भारतानेही अमेरिकेतील अश्वेतांवर होणार्या अत्याचारांवरून अमेरिकेला सुनावण्याची आवश्यकता आहे ! |