विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक ‘जनी जनार्दन ’: डॉ. तात्यासाहेब नातू यांचे जीवन चरित्र
लवकरच वाचायला मिळणार !
चिपळूण, १५ मे (वार्ता.) – तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील ‘देवमाणूस’ या उपाधीने गौरवलेले, तसेच भारत सरकारच्या ‘हाफकिन’ या संस्थेने शोधलेल्या ‘विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक’ स्वर्गीय आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रेय उपाख्य तात्यासाहेब नातू या दैवी अंश लाभलेल्या डॉक्टरांचे जीवनचरित्र लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. या चरित्राचे लेखक श्री. धीरज वाटेकर असून ते कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन पर्यावरण’ चळवळीतील कार्यकर्ते आहेत.
आजच्या काळात जणू दंतकथा वाटावे, असे तात्यासाहेब नातू यांचे संपूर्ण चरित्र या पुस्तकाच्या माध्यमातून प्रथमच वाचकांसमोर येत आहे. एखादा ‘आमदार’ हा ‘देवमाणूस’ असू शकतो, हे सांगून कदाचित् आजच्या पिढीला खरे वाटणार नाही; पण हे सत्य सांगणारे हे चरित्र आहे. आजच्या काळात उद्ध्वस्त होत असलेल्या भारतीय संस्कृतीने उदात्त ठरवलेल्या मूल्यव्यवस्थेचे दर्शन घडविणारे हे चरित्र आहे. तरुण वर्गाला आयुष्यभर पुरेल, इतकी संस्काराची शिदोरी या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध होणार आहे. एका उद्दात हेतूने लवकरच सवलतीच्या दरात हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी संपर्क : विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे भ्रमणभाष : ९१६८६८२२०१/ ०२ / ०९/ ०६ |