बिहारमध्ये मुसलमान तरुणीसोबत जाणार्या हिंदु तरुणाला मुसलमानांकडून बेदम मारहाण !
पोलीस बनले मूकदर्शक !
पाटणा (बिहार) – बिहारच्या पाटणा शहरात १५ मे या दिवशी मुसलमान तरुणीसोबत दुचाकीवरून जाणार्या हिंदु तरुणाला मुसलमान समुदायातील लोकांनी बेदम मारहाण केली. (मुसलमान तरुणांनी हिंदु तरुणींना पळवल्या तर चालते; मात्र हिंदु तरुणांनी मुसलमान तरुणींशी मैत्री केलेली मुसलमानांना चालत नाही. यावरून मुसलमानांची जिहादी वृत्ती दिसून येते !- संपादक) ‘ही मारहाणीची घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली. आक्रमण झालेल्या ठिकाणी पोलीस तैनात होते; मात्र त्यांनी हिंदु मुलावर आक्रमण करणार्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. पोलीस या वेळी मूकदर्शक राहिले’, असा आरोप केला जात आहे.
पटना में समुदाय विशेष के युवकों की गुंडागर्दी, हिंदू लड़के को जमकर पीटा, मूकदर्शक बनी रही पुलिस। pic.twitter.com/WEZQt8hHQd
— News18 Bihar (@News18Bihar) May 15, 2023
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी एक हिंदु तरुण मुसलमान तरुणीसोबत दुचाकीवरून अंजुमन इस्लामिया हॉलजवळून जात होता. या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या मुसलमान समुदायातील काही लोकांनी दुचाकी थांबवली. त्यांनी तरुणाचे नाव विचारले. तो हिंदु असल्याचे कळताच त्याला शिवीगाळ करत मारहाण करणे चालू केले. घटनास्थळापासून अवघ्या काही मीटर अंतरावर पोलीस ठाणे आहे. (सर्रास गुन्हे करणार्या या जिहाद्यांना पोलिसांची भीती न वाटणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|