सत्य सांगण्याचे काम आम्ही करत राहू ! – पू. कालीचरण महाराज
खासदार इम्तियाज जलील यांच्या टिकेला पू. कालीचरण महाराज यांचे सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर
नगर – तुम्हाला बोलण्यापासून कुणी अडवले ?, कुणी निंदा कुणी वंदा कालीकीर्तनचा आमचा धंदा, सत्य सांगण्याचा आमचा धंदा आहे आणि आम्ही बोलत राहू. ‘भो-भो’ करण्याची काहींना सवय असते; मात्र आम्ही आमचे काम करत राहू. तुम्ही येत असाल, तर तुमच्यासह काम करू नसेल, तर तुमच्याविना काम करू, अशा शब्दांत पू. कालीचरण महाराजांनी ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांच्या टिकेला सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ‘भगवे कपडे घालून कुणी स्वामी आणि गुरु होत नाही’, अशी टीका इम्तियाज जलील यांनी पू. कालीचरण महाराज यांच्यावर केली होती.
पू. कालीचरण महाराज यांनी ‘द केरल स्टोरी’वर मत व्यक्त करतांना सांगितले की, हा चित्रपट प्रत्येक हिंदूने पहावा, त्यावर चिंतन करावे, ते तुमच्या समवेतही होऊ शकते. धर्म आणि आई-बहिणींची प्रतिष्ठा वाचवायची असेल, तर अशा चित्रपटांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. स्वार्थ साधण्यासाठी बजरंग दलावर बंदी घालण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही सत्य सांगत आहोत. त्यामुळे त्यांच्या पोटात कळ उठत आहे, असा टोलाही त्यांनी हिंदुविरोधी टीका करणार्यांवर लगावला आहे.