खार (मुंबई) येथे आग लागून ६ घायाळ
खार (मुंबई) – येथील पश्चिम भागातील खारदांडा कोळीवाडा परिसरात सकाळी पावणेनऊच्या सुमारास एका घरात वायूगळतीमुळे आग लागून ६ जण भाजले. गोविंद पाटील मार्गावर हरिश्चंद्र बेकरीजवळ ही घटना घडली. भाजलेल्यांमध्ये २ बालकांचा समावेश आहे. घायाळांना रुग्णालयात भरती केले आहे. हे सगळे जण ४० ते ५० टक्के भाजले असून ते अतीदक्षता विभागात आहेत.