भारताला इस्लामी राष्ट्र बनवू पहाणार्या ‘हिज्ब-उत्-तहरीर’च्या १६ आतंकवाद्यांना अटक !
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील आतंकवादविरोधी पथकाने ‘हिज्ब-उत्-तहरीर’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या १६ आतंकवाद्यांना नुकतीच अटक केली. १० मे या दिवशी राज्यातील भोपाळ, छिंदवाडा, तसेच तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथे धाडी टाकून त्यांना अटक करण्यात आली. १६ पैकी ८ जण हे आधी हिंदु होते. त्यांचा बुद्धीभेद करून त्यांना मुसलमान बनवण्यात आले. संघटनेतील काही आतंकवाद्यांवर हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करून त्यांच्याशी विवाह केल्याचाही आरोप आहे. संघटनेचा प्रमुख महंमद सलीम हा भाग्यनगर येथील एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या मालकीच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होता.
१. महंमद सलीम हा मूलत: सौरभ राजवैद्य नावाचा हिंदु युवक होता. वर्ष २००९ मध्ये त्याचा विवाह झाल्यावर त्याने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता वर्ष २०१० मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला. वर्ष २०१२ मध्ये त्याने त्याच्या पत्नीला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. पुढे त्याने भाग्यनगरमध्ये ओवैसी यांच्या महाविद्यालयात नोकरी केली. पुढे त्याला विदेशातही प्रशिक्षण देण्यात आले.
२. सलीम उपाख्य सौरभप्रमाणेच ओडिशाचा देवी प्रसाद पांडा, तसेच भाग्यनगरचा वेणु कुमार हे इस्लाम स्वीकारून क्रमशः अब्दुल रहमान आणि महंमद अब्बास बनले.
३. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात भोपाळचा व्यायाम प्रशिक्षक यासिर खान याने एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला.
४. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघा जणांच्या पत्नी आधी हिंदु होत्या आणि नंतर त्यांच्यावर दबाव आणून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले.
५. मध्यप्रदेशचे आतंकवादविरोधी पथक अटक करण्यात आलेल्या महंमद सलीम, अब्दुल रहमान, महंमद अब्बास अली, शेख जुनैद आणि महंमद हामिद यांना घेऊन भाग्यनगरमध्ये जाणार आहे. त्या माध्यमातून त्यांचे जाळे कुठपर्यंत आहे ? याचा तपास केला जाईल.
६. आतंकवाद्यांकडून तांत्रिक उपकरणांसह देशविरोधी साहित्य आणि शस्त्रास्त्रेही सापडली आहेत. हे आतंकवादी समाजात संगणक अभियंता, शिक्षक, व्यावसायिक, व्यायाम प्रशिक्षक, व्यायाम प्रशिक्षण केंद्राचे संचालक, रिक्शाचालक, शिंपी आदींच्या रूपात कार्यरत होते. या सर्वांना गुप्त रूपाने जंगलामध्ये शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही देण्यात आले होते.
७. हिज्ब-उत्-तहरीर उपाख्य ‘तहरीक-ए-खिलाफत’ या कट्टरतावादी इस्लामी संघटनेचे कार्य ५० देशांमध्ये असून १६ देशांनी तिच्यावर याआधीच बंदी घातली आहे, अशी माहितीही समोर आली आहे.
संपादकीय भूमिका
|