केरळमध्ये ९ धर्मांध मुसलमानांकडून हिंदु दलित मजुराची हत्या
मल्लापूरम् (केरळ) – येथे राजेश मांझी (३६ वर्षे) नावाच्या बिहारमधील दलित मजुरावर चोरीचा आरोप करत ९ मुसलमानांनी त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अफझल, फाजिल, शराफुद्दीन, महबूब, अब्दुसमद, नासिर, हबीब, अयूब आणि जैनुल अशा ९ जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक सुजित दास म्हणाले की, आरोपींनी राजेशला काठ्या आणि प्लास्टिक पाईप यांद्वारे बेदम मारहाण केली. याचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. राजेश हा मूळचा बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील माधवपूर येथील रहिवासी होता. तो मजुरी करण्यासाठी बिहारहून केरळ येथे आला होता.
संपादकीय भूमिकाएरव्ही दलितप्रेम दाखवणारी काँग्रेस आणि ‘दलित-मुसलमान भाऊ भाऊ’ म्हणणारे मुसलमान आता गप्प का ? |