६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

श्री. विनायक शानभाग हे सनातन संस्थेला मिळालेले अनमोल रत्न आहे. त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. १५.५.२०२३ या दिवशी या गुणवैशिष्ट्यांचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग येथे देत आहोत.

या लेखाचा भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/682956.html

३. स्थुलातील १० भाषांचे आणि सूक्ष्मातील देवभाषेचे ज्ञान असलेले श्री. विनायक शानभाग !

श्री. विनायक शानभाग

विनायकदादा यांच्यामध्ये जन्मतःच गणेशतत्त्व आहे. त्यामुळे त्यांना मराठी, कोकणी, कन्नड, तेलुगु, तुळू, मल्याळम, तमिळ, ओडिया, हिंदी आणि इंग्रजी या १० भाषांचे ज्ञान आहे. त्यांच्यामध्ये श्री गणेशाच्या कृपेने देवभाषेचे मनुष्य भाषेत भाषांतर करण्याची क्षमता असल्यामुळे जेव्हा त्यांच्या मनामध्ये देवाचे विचार येतात, तेव्हा त्यांना प्रकाशभाषेचे आकलन होऊन तिचे रूपांतर शब्दजन्य नादभाषेत होते आणि ते निवेदन करतात. सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून तमिळ भाषेमध्ये करत असलेल्या मार्गदर्शनाचे विनायकदादा मराठी भाषेत भाषांतर करून पार्वतीस्वरूप असणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू यांना सांगतात. त्यांच्या बुद्धीमध्ये श्री गणेश आणि वाणीवर सरस्वतीमाता सूक्ष्मातून विराजमान आहेत. त्यामुळे त्यांची बुद्धी प्रगल्भ आणि मेधावी (ज्याच्यामध्ये मेधाबुद्धी कार्यरत असते त्याला ‘मेधावी’ म्हणतात.) असून त्यांची वाणी सुमधुर अन् चैतन्यदायी आहे.

३ अ. बुद्धीच्या ‘प्रतिभा, प्रज्ञा आणि मेधा’ या तीन प्रकारांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्यातील भेद

४. श्री. विनायकदादांमध्ये ज्ञानयोग आणि भक्तीयोग यांचा संगम झालेला असणे

कु. मधुरा भोसले

विनायकदादा यांनी गेल्या जन्मांमध्ये केलेल्या साधनेमुळे त्यांच्या साधनेचा मार्ग ज्ञानयोग आणि भक्तीयोग आहे. त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केल्यामुळे त्यांच्यावर गुरुकृपा होऊन त्यांची या जन्मात गुरुकृपायोगांतर्गत ज्ञानयोग आणि भक्तीयोग यांनुसार साधना चालू आहे. त्यांच्यातील ज्ञानयोगामुळे त्यांना दैवी विचारांचे सहजरित्या आकलन होते आणि भक्तीयोगामुळे ते सर्व सूत्रे भावपूर्णरित्या सांगतात. त्यामुळे त्यांचे निवेदन ऐकत असतांना श्रोत्यांना ज्ञान मिळून त्यांची भावजागृती होते.

५. श्री. विनायकदादांमध्ये देवर्षि नारद यांचेही तत्त्व कार्यरत असणे

विनायकदादांमध्ये देवर्षि नारद यांचेही तत्त्व कार्यरत असते. ज्याप्रमाणे देवर्षि नारद सप्तलोक आणि सप्तपाताळात भ्रमण करून तेथे वास करणार्‍या भगवद्भक्तांना भगवंताचा संदेश देतात अन् श्रीविष्णूच्या भक्तीचा प्रसार करतात, त्याप्रमाणे कार्य विनायकदादाही करतात. श्री. विनायकदादांच्या मनात सतत शिष्यभाव जागृत असल्यामुळे ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. त्यामुळे ते श्रीचित्‌शक्ति गाडगीळकाकू यांच्या समवेत दैवी दौर्‍यांवर जाऊन दैवी प्रवासांत आलेल्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे अन् श्रीचित्‌शक्ति गाडगीळकाकू यांनी केलेले मार्गदर्शन यांचा लेख सिद्ध करतात. त्याचप्रमाणे ते दौर्‍यावर जेथे जातात, तेथे विष्णुस्वरूप असणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू यांचा महिमा सांगून भक्तीचा प्रसार करतात.

६. श्री. विनायक शानभाग यांच्या साधनेचे योगमार्ग, त्यानुसार त्यांना येणारी अनुभूती आणि त्यांच्याकडून होणार्‍या साधनेचे प्रमाण

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०२२) (समाप्त)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक