हिंदु संस्कृतीचे महत्त्वपूर्ण अंग असणार्या यज्ञयागांचे महत्त्व अधोरेखित करणारे संशोधन !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘महर्षींच्या आज्ञेने मे २०२२ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री सुदर्शनयाग (१९.५.२०२२), मृत्यूंजययाग (२०.५.२०२२), श्री बगलामुखीयाग (२४.५.२०२२), श्री प्रत्यंगिरायाग (२५.५.२०२२) आणि श्री चंडीयाग (२६ अन् २७.५.२०२२) करण्यात आले. तसेच २०.५.२०२२ या दिवशी संतांच्या (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) हस्ते श्री कार्तिकेय अन् श्री सिद्धिविनायक या देवतांच्या मूर्तींना अभिषेक करण्यात आला.
सनातनच्या आश्रमात झालेल्या यागांच्या संदर्भात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले. ते पुढे दिले आहे. १५ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन वाचले. आज लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
भाग १ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/682818.html
१ इ. महर्षींनी तिन्ही गुरूंच्या रक्षणार्थ त्यांच्या खोल्यांमध्ये ठेवण्यासाठी दिलेले हळदीचे कंद यागांतील चैतन्याने भारित होणे : हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान कार्यात अडथळे आणण्यासाठी मोठ्या अनिष्ट शक्ती तिन्ही गुरूंवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या दोन आध्यात्मिक उत्तराधिकारी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) यांच्यावर) सूक्ष्मातून प्राणघातक आक्रमणे करतात. त्यांपासून तिन्ही गुरूंचे रक्षण व्हावे, यासाठी महर्षींनी हळदीचे १-१ कंद (टीप) तिन्ही गुरूंच्या खोलीत ठेवण्यास सांगितले. हे तिन्ही कंद यागातील चैतन्याने भारित होण्यासाठी प्रतिदिन यागाच्या ठिकाणी ठेवण्यात आले. प्रत्येक यागापूर्वी तिन्ही कंदांमध्ये काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा आढळून आली. यागानंतर मात्र कंदांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. यातून ‘महर्षींनी तिन्ही गुरूंच्या रक्षणासाठी किती अचूक अन् परिणामकारक आध्यात्मिक उपाय सांगितले’, हे लक्षात येते.
टीप – ‘कंद म्हणजे काळी हळद आहे. यामध्ये मारक शक्तीशी संबंधित महाकालीदेवीचे तत्त्व असते. हे संरक्षण-कवच निर्माण करण्यासाठी असते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१४.४.२०२३)
१ इ १. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीतील आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या खोलीतील कंदामधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सुदर्शनयागाच्या नंतर न्यून होण्यामागील कारण : ‘कंद’रूपी काळ्या रंगाच्या हळदीमध्ये प्रामुख्याने श्री महाकालीदेवीचे तत्त्व कार्यरत असते. सुदर्शनयागापूर्वी या हळदीमध्ये श्री महाकालीदेवीचे सगुण तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाले होते. त्यामुळे या कंदाच्या नोंदीमध्ये तिच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक आहे. सुदर्शनयागानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री चित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या खोलीतील कंदामधील श्री महाकालीदेवीचे सगुण तत्त्व न्यून झाले. तसेच त्या दोघी सनातन संस्थेच्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर झालेल्या मोठ्या अनिष्ट शक्तींचे आक्रमण कंदामध्ये आकृष्ट झाले. आक्रमणातील त्रासदायक शक्तीशी लढण्यामध्ये कंदामध्ये असणार्या सकारात्क ऊर्जेचा व्यय झाला. त्यामुळे त्यांच्या खोलीत ठेवलेल्या कंदातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सुदर्शनयागानंतर न्यून झाली. याला ‘दैवी कृपेने सद्गुरूंवरील गंडांतर टळणे’, असे म्हणतात.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२३)
१ ई. यागात हविर्द्रव्यांची आहुती दिल्यावर यज्ञकुंडातून निघणार्या धुरांतून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे : महर्षींनी सांगितल्यानुसार प्रत्येक यागात करूंगाळी चूर्ण अन् मूलिका चूर्ण या हविर्द्रव्यांची, तसेच ‘गवती चहा’, ‘हिना’ अन् ‘मारवा’ या अत्तरांची आहुती देण्यात आली. यागात त्या त्या वेळी घटकाची आहुती दिल्यानंतर यज्ञकुंडातून निघणार्या धुराच्या चाचण्या करण्यात आल्या. यागांतील धुरांमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याचे लक्षात आले. यागांतील चैतन्य वातावरणात प्रक्षेपित होत असल्याने वातावरणाची शुद्धी होऊन सात्त्विकता वाढते.
१ उ. यागांतील विभूतीमध्ये उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य असणे : महर्षींच्या आज्ञेने समष्टीच्या कल्याणार्थ करण्यात आलेल्या यागांतून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाले. या चैतन्याने यागातील विभूती भारित झाली. त्यामुळे यागांतील विभूतीमध्ये उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) आहे. (याची सारणी बाजूला दिली आहे.)
२. संतांनी श्री कार्तिकेय आणि श्री सिद्धिविनायक देवतांच्या मूर्तींना भावपूर्ण अभिषेक केल्यानंतर मूर्ती अन् त्यांना अभिषेक केलेले जल यांच्यातील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे
देवतांना अभिषेक करण्यासाठीचे जल संतांच्या (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या) चैतन्यमय हस्तस्पर्शाने भारित झाले. संतांनी देवतांना भावपूर्ण अभिषेक केल्याने देवतांतील तत्त्व (चैतन्य) जागृत होऊन कार्यरत झाले. यामुळे अभिषेकानंतर देवतांच्या मूर्ती आणि त्यांच्यावर अभिषेक केलेले जल यांच्यातील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली.
थोडक्यात यज्ञयाग हे हिंदु संस्कृतीचे महत्त्वपूर्ण अंग आहे. यज्ञयागातील सर्व घटक, उदा. यागाचा उद्देश, यागाचे स्थळ, यागाचे यजमान अन् पुरोहित, यागातील पूजासाहित्य आदी घटक जेवढे सात्त्विक असतील, तेवढी यागाची फलनिष्पत्ती उत्तम मिळते. महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या यागांच्या संशोधनातून हे लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.४.२०२३)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
|