अंमलबजावणी संचालनालयाकडून जयंत पाटील यांना दुसर्यांदा समन्स !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चौकशीसाठी उपस्थित रहाण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडून दुसर्यांदा समन्स पाठवण्यात आला आहे. पाटील यांना २२ मे या दिवशी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित रहाण्याचा आदेश अंमलबजावणी संचालनालयाकडून देण्यात आला आहे. जयंत पाटील यांना काही आस्थापनांकडून मोठी रक्कम प्राप्त झाल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पाटील यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
Jayant Patil : जयंत पाटलांना पुन्हा ईडीचे समन्सhttps://t.co/ugwJpDxFJv#JayantPatil #ED #Summons #NCP
— Deshdoot (@deshdoot) May 15, 2023