मुंबईतील कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराजां’चे नाव देणार !
मुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांची १४ मे या दिवशी ३६६ वी जयंती महाराष्ट्रात साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळाही उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
#Mumbai छत्रपति संभाजी महाराज के नाम पर होगी मुंबई की कोस्टल रोड,
मुम्बई के CM एकनाथ शिंदे ने पूरा किया हिंदू हृदय सम्राट बाल ठाकरे का सपना,संभाजी की भव्य मूर्ति का भी होगा निर्माण,कोस्टल रोड का नाम अब बदलकर छत्रपति संभाजी महाराज के नाम पर रखा जाएगा#ChhatrapatiSambhajiMaharaj pic.twitter.com/tasax8oFtE
— सिरोही की आवाज (@Sirohikiaawaz) May 14, 2023
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.