येरवडा (जिल्हा पुणे) येथे धर्मांध टोळक्याने केली विक्रेता दांपत्याला मारहाण !
गुन्हेगारीत आघाडीवर असणारे धर्मांध !
पुणे – येरवडा भागामध्ये किरकोळ वादातून किराणा माल दुकानांची तोडफोड आणि विक्रेत्याला तलवारीचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंदवला. इलियास शेख, सलमा शेख, फारुख शेख, नदीम शेख, अमिन शेख अशी त्यांची नावे आहेत.
या प्रकरणी अक्षय शिंदे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. केवळ ‘दुकानासमोर भांडणे करू नका’, असे अक्षय याने सांगितले म्हणून इलियासने नातेवाइकांना बोलावून तोडफोड आणि मारहाण केली, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.