एन्.आय.ए.कडून काश्मीरमध्ये विविध ठिकाणी धाडी
बंदी घालण्यात आलेल्या जमात-ए-इस्लामीच्या ठिकाणांवर धाडी
श्रीनगर – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) जम्मू-काश्मीरमधील बडगाव आणि बारामुल्ला या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी धाडी टाकल्या. बंदी घालण्यात आलेला राजकीय पक्ष जमात-ए-इस्लामी हा आतंकवादी संघटनांना आतंकवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अर्थपुरवठा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचे पुढील अन्वेषण करण्यासाठी या धाडी टाकण्यात आल्या. या प्रकरणी एन्.आय.ए.ने देहलीच्या पतियाळा न्यायालयात ४ जणांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.
G20 से पहले जम्मू कश्मीर के पुलवामा-शोपियां में NIA की रेड, टेरर फंडिंग का मामला#G20India | #TerrorFunding | #Pulwama https://t.co/6jJvTNJJth
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) May 15, 2023
अ. ४ मे या दिवशीही एन्.आय.ए.ने १६ ठिकाठी धाडी टाकल्या होत्या. त्या वेळी ११ ठिकाणी बारामुल्ला जिल्ह्यात, तर किश्तवर जिल्ह्यात ५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्या वेळी आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले होते.
आ. जमात-ए-इस्लामीचे सदय आरोग्य आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्याच्या नावाखाली लोकांकडून देणग्या गोळा करून त्याचा वापर आतंकवादी कारवायांसाठी करतात, अशी माहिती एन्.आय.ए.ला प्राप्त झाली आहे. या संघटनेला विदेशातूनही आर्थिक साहाय्य मिळते. हा पक्ष हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनांनाही साहाय्य करते.
इ. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत या पक्षावर फेब्रुवारी २०१९ मध्ये ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.