धर्मांध पतीचे लव्ह जिहादी स्वरूप उघड झाल्यावर त्याच्याकडून हिंदु पत्नीला तलाक !
लक्ष्मणपुरी – रकाबगंज येथे राजा खान नावाच्या मुसलमानाने हिंदु युवतीशी तो हिंदु असल्याचे सांगत ओळख वाढवली. संबंधित हिंदु तरुणी त्याच्या घरी गेल्यावर तिला त्याची खरी ओळख पटली. त्या वेळी तरुणीने राजा खान याच्याशी संबंध तोडले; मात्र राजा खान याने तिला बंदी बनवले आणि बळजोरीने तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला. त्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास आरंभ केला. या काळात संबंधित हिंदु तरुणीला ‘राजा खान हा लव्ह जिहादी असून त्याने अनेक हिंदु तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे लक्षात आले. याविषयी तिने राजा खान याच्या कुटुंबियांना विचारल्यावर त्यांनी तिला मारहाण केली. यानंतर राजा खान याने हिंदु तरुणीला तलाक दिला आणि तिला घरातून हाकलून लावले.
मिस कॉल से प्यार:बंधक बनाकर किया निकाह, जबरन बच्चे पैदा कराए; बोली- पति का मिशन है लव जिहाद – Married By Taking Hostage Forced To Give Birth To Children Husband Mission Is Love Jihad https://t.co/XbQ0FVEri7
— गाज़ियाबाद365 (@Ghaziabad365) May 14, 2023
हिंदु तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली; मात्र पोलीस धीम्या गतीने अन्वेषण करत असल्यामुळे तरुणी न्यायालयात गेली. (उत्तरप्रदेशात लव्ह जिहाद कायदा असतांनाही अशा प्रकरणांचे अन्वेषण धीम्या गतीने का होते ? – संपादक) न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांना प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यास आदेश दिला आहे.