मुसलमान तरुणींसोबत जाणार्या हिंदु तरुणाला मुसलमानांकडून मारहाण !
लक्ष्मणपुरी – मेरठमधील भगत सिंह बाजारपेठेत २ मुसलमान तरुणी त्यांच्या हिंदु मित्रासोबत जात असतांना काही धर्मांध मुसलमान तरुण तेथे आले. त्यांनी हिंदु तरुणाला मारहाण केली आणि मुसलमान तरुणींनी परिधान केलेला बुरखा त्यांना काढायला लावला. या प्रकरणी पोलिसांनी २ अज्ञात मुसलमानांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. संबंधित मुसलमान तरुणी आणि हिंदु तरुणी जात असतांना मुसलमान युवकांनी त्याला मुसलमान तरुणींना हटकले आणि त्यांना त्यांच्या वडिलांचे नाव विचारले. त्या वेळी त्यांनी हिंदु युवकाला धक्काबुक्की केली. संबंधित मुसलमान तरुणींनी सांगितले की, हिंदु तरुण त्यांचा मित्र आहे. त्या वेळी मुसलमान युवकांनी ‘तुम्ही हिंदूशी मैत्री का करता ?’, असा प्रश्न विचारला.
‘हिन्दुओं को दोस्त बनाओगी?’: कट्टरपंथियों ने 2 मुस्लिम लड़कियों से की बदसलूकी, नकाब उतरवाया, उनके हिन्दू दोस्त को भी पीटा – Video वायरल#Meerut #Videohttps://t.co/rY8fHGxAK8
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 14, 2023
संपादकीय भूमिकानेहमी हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे अशा घटनांनंतर मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! |