आजपासून सोलापूर येथे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या सामाजिक कीर्तनमालेस प्रारंभ !
सोलापूरकरांना उपस्थित रहाण्याचे आवाहन
सोलापूर, १४ मे (वार्ता.) – येथील अखिल भारत पद्मशाली पुरोहित वैदिक ज्ञानपीठम्, श्रीराम जन्मोत्सव समिती, पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या श्रीराम कथा’ या सामाजिक कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १७ मे या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता कुचन प्रशाला येथे ही सामाजिक कीर्तनमाला चालणार आहे, अशी माहिती पाखर संकुलच्या संस्थापिका शुभांगी बुवा आणि पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी श्री. पुरुषोत्तम उडता, श्री. आकाश शिरते उपस्थित होते.
धर्माचरण, धर्मशिक्षण, तसेच धर्मरक्षणातून राष्ट्रीयत्व आणि आपले कर्तव्य आदी विषयांवर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे मार्गदर्शन करणार आहेत. सोलापूर शहरातील नागरिकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारत पद्मशाली पुरोहित वैदिक ज्ञानपीठम्, श्रीराम जन्मोत्सव समिती, पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.