कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद सीबीआयचे नवे महासंचालक !
नवी देहली – केंद्रीय अन्वेषण विभागाचे म्हणजे सीबीआयचे नवे महासंचालक म्हणून कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयचे मावळते महासंचालक सुबोध जयसवाल यांचा कार्यकाळ २५ मे या दिवशी संपणार आहे. त्या दिवशी सूद कार्यभार हातात घेतील. प्रवीण सूद पुढील २ वर्षे या पदावर रहाणार आहेत.