बलुचिस्तानमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात पाकचे ७ सैनिक ठार
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतात आतंकवाद्यांनी निमलष्करी दलाच्या तळावर आक्रमण केले. त्या वेळी पाकिस्तानी सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ७ पाकिस्तानी सैनिक ठार झाले. पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार या वेळी ६ आतंकवादीही ठार झाले आहेत. हे आक्रमण बंदी घालण्यात आलेली तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या आतंकवादी संघटनेने केल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी नोव्हेंबर मासात या संघटनेशी शांतता चर्चा आयोजित करण्यात आली होती; मात्र ती अयशस्वी झाल्यामुळे या संघटनेच्या आतंकवाद्यांकडून पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात आतंकवादी कारवाया करण्यात येत आहेत.
संपादकीय भूमिकापाकने आतंकवाद पोसला. तो आता त्याच्यावर उलटला आहे, हे या आतंकवादी आक्रमणातून दिसून येते ! |