अपघातात मृत्यू झालेल्यावर गुन्हा नोंद का ?
‘कुडाळ (सिंधुदुर्ग) तालुक्यातील माणगाव-वाडोस मार्गावरून प्रवास करतांना आंबेरी येथे दुचाकीस्वार सीताराम भिकाजी शृंगारे (वय ६० वर्षे, रहाणार ओटवणे, सावंतवाडी) यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात घायाळ झालेल्या शृंगारे यांचा सावंतवाडी येथे रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू झाला. या प्रकरणी स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या प्रकरणी दुचाकीस्वार शृंगारे यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.’