कोल्हापूर येथील पंचगंगेमध्ये ४ महिलांना बुडतांना जीवरक्षकांनी वाचवले !
कोल्हापूर – मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या ४ महिला पंचगंगेत बुडत असतांना जीवरक्षकांनी सतर्कतेने वाचवल्याने अनर्थ टळला. लगेचच महिलांना उपचारासाठी सीपीआरमध्ये भरती करण्यात आले आहे. जीवरक्षकांनी दाखवलेल्या धाडसाने चारही महिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्या. जीवरक्षक उदय निंबाळकर यांच्यासह विनायक जाधव, तसेच अजिज शेख यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उड्या घेत चारही जणींना मोठ्या धैर्याने बाहेर काढले.