नाशिक येथील श्री सप्तशृंगीदेवीच्या दर्शनाला जाणार्या महिला भाविकांच्या दागिन्यांची चोरी !
नाशिक – भाविकांचे श्रद्धास्थान आणि उत्तर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर मेच्या सुट्टीमध्ये लाखो भाविक श्री सप्तशृंगीदेवी दर्शनासाठी गर्दी करत आहेत. अशातच महिलांच्या अंगावरील दागिने चोरणार्या चोरट्या महिलांची टोळी सक्रिय झाली असून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची साखळी, कानातले, पर्समधून पैसे चोरणे, पुरुषांचे पाकीट, भ्रमणभाष चोरणे असे प्रकार घडत आहेत. बारामती येथून आलेल्या महिलेचा ३ तोळ्यांचा सोन्याचा हार चोरला. चोरांच्या टोळीमध्ये ६-७ महिलांचा समावेश आहे. ‘पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटाही येथे तैनात असायला हवा’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संपादकीय भूमिका
|