विज्ञापनाद्वारे स्वतःची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप !
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याकडून तक्रार प्रविष्ट !
मुंबई – भारताचे प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी त्यांची प्रतिमा मलीन केल्याविषयी मुंबई पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. अनुमतीविना सचिन यांचे नाव, छायाचित्र, तसेच आवाज यांचा वापर केल्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला.