नेहमीच्या विकारांवरील प्राथमिक उपचार
१. ताप – सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण
‘पाव चमचा सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण अर्धी वाटी गरम पाण्यात मिसळून दिवसातून ३ – ४ वेळा प्यावे. हा उपचार ५ ते ७ दिवस करावा.
२. खोकला – सनातन वासा (अडुळसा) चूर्ण
पाव चमचा वासा (अडुळसा) चूर्ण अर्धा चमचा मधात मिसळून दिवसातून ३ – ४ वेळा चाटून खावे. हा उपचार ७ दिवस करावा.
सूचना
१. औषधांच्या प्रमाणासाठी चहाचा चमचा वापरावा.
२. प्राथमिक उपचार करून गुण न आल्यास वैद्यांचा समादेश घ्यावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२३)