गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !
विशेष सदर !
साधकांना संसारमायेतून निवृत्त करणारे आणि माता-पितादी सर्वस्वरूप असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः नमन !
‘त्वं पिता त्वं च मे माता त्वं बन्धुस्त्वं च देवता ।
संसारप्रतिबोधार्थं तस्मै श्रीगुरवे नमः ।।
– गुरुगीता, श्लोक ३५
अर्थ : संसाररूपी मायेतून जाग येण्यासाठी, संसारातून निवृत्त होण्यासाठी हे गुरुदेव, आपणच माझे पिता, आपणच माता, आपणच बंधू आणि आपणच माझी इष्टदेवता आहात. अशा श्री गुरूंना नमस्कार असो.
भावार्थ : साधकांना या घोर संसाररूपी मायेतून मुक्त करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विविध प्रकारे रूपे धारण करून दिशा देत असतात. तेच सर्व साधकांचे माता, पिता, बंधू आणि आराध्य दैवत आहेत. ते वेळप्रसंगी साधकांसाठी आवश्यक असलेले नाते निभावतात, तर कधी सर्व नात्यांच्या बंधनांच्या पलीकडे असलेल्या शाश्वत तत्त्वरूपात दर्शन देतात. साधकांसाठी सर्वस्व असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना करूया, ‘हे गुरुदेवा, आम्हा साधकांचे सारे जीवन आपल्यातच सामावून जाऊ दे. ‘आपणच आमचे सर्वस्व आहात’, हे भान आम्हाला सतत राहू दे.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१३.५.२०२३)