मुंबई शहरात १७ ठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ उभारणार !
राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विकास विभागाचा निर्णय !
मुंबई – सार्वजनिक ठिकाणी तान्ह्या बाळाला दूध पाजतांना महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्याच्या महिला आणि बाल कल्याण विकास विभागाने मुंबई शहरात १७ ठिकाणी ‘हिरकणी कक्षा’ची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी मुंबई सेंट्रल, परळ आणि दादर येथील बसस्थानकांवर ‘एसी बेबी फिडिंग सेंटर’ (बाळाला आहार देणारे वातानुकूलित केंद्र) उभारण्याचे काम चालू आहे.
एस्.टी. महामंडळाच्या कुर्ला नेहरूनगर बसस्थानकातही हिरकणी कक्ष उभारण्यात येत असल्याची माहिती महामंडळाच्या अधिकार्यांनी दिली आहे.